
ही सेवा तुमच्या मतदारांशी अधिक जवळीक साधण्यास, योग्य रणनीती आखण्यास, आणि मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.
सिंहासन निवडणूक प्रचार - यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड!
मतदान यादी आणि सर्वेक्षण यांचे मॅपिंग सेवा
तुमच्या निवडणुकीच्या यशस्वी नियोजनासाठी मतदान यादी आणि सर्वेक्षण डेटा यांचे अचूक मॅपिंग महत्त्वाचे आहे. आम्ही ही प्रक्रिया अत्यंत सोप्या व तांत्रिक पद्धतीने साकारतो, ज्यामुळे मतदारसंघातील मतदारांशी संपर्क अधिक प्रभावी होतो.
सेवेची वैशिष्ट्ये:
- मतदान यादीचे विश्लेषण: अधिकृत मतदान यादीतील प्रत्येक मतदाराचा सखोल अभ्यास.
- सर्वेक्षण डेटाशी मॅपिंग: कुटुंबनिहाय सर्वेक्षणातून मिळालेली माहिती मतदान यादीशी जोडणे, ज्यामुळे एकत्रित व सुसंगत डेटा तयार होतो.
- डेटाचा सुस्पष्ट नकाशा: वस्तीनुसार, क्षेत्रानुसार, आणि प्रभागानुसार डेटा वर्गीकरण, ज्यामुळे कार्यकर्त्यांना नेमक्या ठिकाणी पोहोचणे सोपे होते.
- डुप्लिकेट आणि विसंगती शोधणे: मतदान यादी व सर्वे डेटा यातील डुप्लिकेट एंट्री किंवा विसंगती ओळखून त्या दुरुस्त करणे.
- तांत्रिक समर्थन: डेटाचे डिजिटल स्वरूप तयार करून कार्यकर्त्यांसाठी वापरण्यास सुलभ फाईल्स व अहवाल तयार करणे.